चिखली :"एक गाव, एक शिवजयंती" या उत्सवासाठी महापालिकेने आवश्यक त्या सुविधा पुरवाव्यात नगरसेवक दिनेश यादव यांची मागणी

पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन)- श्री. क्षेत्र टाळगाव चिखली येथे "एक गाव, एक शिवजयंती" या उत्सवासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने आवश्यक त्या सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी स्वी. नगरसेवक दिनेश यादव यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

या पत्रात यादव यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरामधील सर्वात मोठी शिवजयंती चिखली भागात आयोजित केली जाते. हजारो शिवभक्त चिखली भागात शिवजयंती निमित्त एकत्र येतात. चिखली परिसर आपल्या हद्दीत येत असून, महापालिकेच्या वतीने पुढील सुविधा पुरविणे महापालिकेचे कर्तव्य आहे, अशी शिवभक्तांची अपेक्षा आहे.

१. पवारवस्ती ते चिखली चौकापर्यंत रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवावे.
२. कुदळवाडी ते चिखली सर्व स्ट्रीट लाईन पोल दुरुस्त करावे.
३. पवारवस्ती ते चिखली रस्त्यावरील सर्व कचरा आणि माती उचलण्यात यावी.
४. पवारवस्ती ते चिखली रोडलगत उभी असलेली बेवारस वाहने बाजूला करण्यात यावी.
५. कुदळवाडी ते चिखली अनेक ठिकाणी रस्त्यावर ड्रेनेज स्ट्राॅम वाॅटर वाहत आहेत ते बंद करण्यात यावे.
६. शिवजयंतीच्या दिवशी पिण्याचे पाणी व फिरते शौचालय उपलब्ध करून द्यावे.

Review